Chimur taluka@ news
• चिमूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची रेतीघाट सुरू करण्याची मागणी
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चिमूर: तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून रेतीघाट बंद असल्यामुळे अनेक बांधकाम रेती अभावी अडचणीत आलेले आहे. तद्वतच रेती घाट बंद असल्यामुळे रेती तस्करांचे चांगलेच फावत आहेत. अनेक घरकुल लाभार्थी व इत्तर बांधकाम करणाऱ्या जनतेला अतिशय महाग दरात रेती विकत घ्यावी लागत आहे. जनतेची अडचण लक्षात घेता रेती घाटांचा लिलाव करून घाट सुरू करावे जेणेकरून घरकुल लाभार्थ्यांना व इत्तर बांधकाम धारकांना होणारी रेतीची अडचण दूर होईल यासाठी चिमूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणीचे एक लेखी निवेदन सादर केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मनिषा वजरे ,दीपक दुधे ,मेहबूब शेख , स्वरूप तळवेकर , संजय घरत, गौतम रामटेके आदिं उपस्थित होते.
