Home Breaking News Ballarpur city@ news • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय जिल्हाध्यक्षपदी प्रशांत झांबरेंची...

Ballarpur city@ news • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय जिल्हाध्यक्षपदी प्रशांत झांबरेंची नियुक्ती

212

Ballarpur city@ news
• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय जिल्हाध्यक्षपदी प्रशांत झांबरेंची नियुक्ती

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर : मुंबई स्थित देवगिरी बंगल्यावर झालेल्या एका कार्यक्रमात अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशांत झांबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

उपरोक्त कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदिं मंडळी उपस्थित होती .

प्रशांत झांबरे हे गेल्या दोन दशकांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय असून अनेक आंदोलनात व सामाजिक कार्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग लाभलेला आहे .याच कार्याची दखल घेत झांबरे यांची राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांची थेट जिल्हाध्यक्ष पदी निवड केली. यावेळी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. राकेश सोमानी, दर्शन मोरे, संघरतन फुलकर, समीर खान, मनोज बालमवार उपस्थित होते.

या नियुक्तीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सचिव आबीद अली, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, महिला जिल्हाध्यक्ष रंजना पारशिवे, कार्याध्यक्षा अर्चना बुटले, नगरसेवक महेंद्रसिंग चंदेल, विलास नेरकर, सुनील काळे, महादेव देवतळे, सुजित उपरे यांनी शुभेच्छा देत अजित दादा पवार, सुनील तटकरे व सुनील मगरे यांचे आभार मानले.