Home Breaking News Varora taluka@ news • पंचशील बौद्ध विहारात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Varora taluka@ news • पंचशील बौद्ध विहारात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

111

Varora taluka@ news
• पंचशील बौद्ध विहारात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

✍️ग्यानीवांत गेडाम
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

वरोरा :तालुक्यातील सालोरी येन्सा ब्लॉक मजरा ( लहान) येथील पंचशील बौद्ध विहारात स्त्री शिक्षणाची देवता, थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयघोष करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून बुद्ध वंदनेने करण्यात आली. व मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात बौद्ध पंचशील कमिटीचे माजी अध्यक्ष व ग्राम पंचायत सदस्या प्रतिभा मानकर, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते ग्यानीवंत गेडाम, सुरेंद्र खोब्रागडे, लालचंद पाटील,जेष्ठ कार्यकर्ते आबा रामटेके, सिद्धार्थ वानखेडे,वावरे, सुरेंद्र वावरे, दिक्षा धाबेकर, पंकज रामटेके, कैलास गेडाम, अनुराग गडेकर, उमरे, माया भरणे, रमा गेडाम, उज्वला गेडाम व गावातील सर्व बौद्ध उपासक -उपासिका, बौद्ध अनुयायी व गावातील नागरिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.