


Mul taluka@ news
• स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फूले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मूल नगरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन !
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
मूल: महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) चंद्रपूर ,स्थापित मैत्रीण लोकसंचालित साधन केंद्र ,मूल दीनदयाल राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद मूल वीर सावरकर वॉर्ड क्रमांक १२ येथील नवदुर्गा , शिवशक्ती , माॅ संतोषी, शुभांगी आनंदी ,गुंजन ,स्वरा, उत्कर्ष ,महिला बचत गट इत्यादी बचत गटांच्या वतीने रविवार दि.७ जानेवारीला दुपारी १२वाजता मूल -ताडाळा मुख्य मार्गावरील मातोश्री लाॅन मध्ये स्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मूल क्रिस्टल र्कॉन्व्हेटच्या प्रिन्सिपॉल गौतमी नखाते यांनी विभूषित केले होते तर याच आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विषमता निर्मूलन दलचे अध्यक्ष हिरालाल भडके, सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली तांगडे, सहयोगिनी तथा चंद्रपूर जिल्ह्यातील सुपरिचित सामाजिक महिला कार्यकर्त्या नलिनी आडपवार, दिलीप रामटेके , सविता चौके ,अरुणा सहारे प्रामुख्याने उपस्थित होते.शारदा प्रविण दंडीकवार यांनी प्रास्ताविक भाषण केले.कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या बोलण्यातून देशात मुलींसाठी पहिली शाळा काढून महिलांना शिक्षणाची दारे उघडणा-या प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. मी सावित्री बोलतेय हा एकपात्री प्रयोग वैशाली नागोसे यांनी उत्तमरित्या या वेळी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.याच कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांची वक्तृत्व स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धा घेण्यात आली . अनुक्रमे या स्पर्धेत कुंदा फाले, सविता चौके, ललिता हुलके,तेजेन्द्र पटवा ,शितल मुप्पीडवार,अरुणा सहारे, मोनिका महाजनवार, श्रध्दा महाजनवार ,राशी नागोसे,अनधा चौके,जन्नत पटवा,परमीत कौर, परि लाकडे ,आदिती लाकडे आदिंनी भाग घेतला.कार्यक्रमाचे सुरेख संचालन मोनिका महाजनवार व वैशाली नागोसे यांनी केले.शेवटी उपस्थितीतांचे आभार संगिता मेश्राम यांनी मानले.कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येंने उपस्थित होत्या.आयोजित स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैशाली नागोसे,जोशना भेंडारे, सविता चौके, दामिनी समर्थ, सुवर्णा बट्टे, माधूरी काळबांधे, मनीषा गांडलेवार, वनिता नरुले, सुनिता सहारे, सुनिता गोहणे,माला महाजनवार,उषा कामडी, राधिका चव्हाण,शितल कुंदीकुरवार, ललिता हुलके व पपिता चुधरी यांनी अथक परिश्रम घेतले.
