Home Breaking News Chimur taluka@ news • तलवारीसारखी पत्रकारांची लेखणी दूधारी :- पोलीस निरीक्षक मनोज...

Chimur taluka@ news • तलवारीसारखी पत्रकारांची लेखणी दूधारी :- पोलीस निरीक्षक मनोज गभने • “पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांची उपस्थिती” • “व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा”

98

Chimur taluka@ news
• तलवारीसारखी पत्रकारांची लेखणी दूधारी :- पोलीस निरीक्षक मनोज गभने

• “पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांची उपस्थिती”

• “व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा”

✍️ शार्दुल पचारे
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी चिमूर

चिमूरः-चिमूर तालुक्यातील व्हॉईस ऑफ मिडिया चिमूरच्या वतीने स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन शहीद बालाजी रायपूरकर सभागृह येथे साजरा करण्यात आला. यावेळी शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमामधील मंचावर पोलीस निरीक्षक मनोज गभणे, व्हॉइस ऑफ मिडिया चिमूरचे तालुका अध्यक्ष रामदास हेमके, पत्रकार जितेंद्र सहारे, चिमुर प्रेस मिडीया फाऊंडेशन चिमुरचे अध्यक्ष पत्रकार पंकज मिश्रा उपस्थित होते. स्व. बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पूजन करून स्वागत समारंभाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज गभने व पत्रकार जितेंद्र सहारे यांनी विचार वक्त केले, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन पोलीस निरीक्षक मनोज गभने म्हणाले की, तलवारीसारखी पत्रकारांची लेखणी हि सुद्धा दूधारी आहे.

ते चांगल लिहत असतात तसेच वाईट सुद्धा लिहत असतात. यामुळे दुधारी आहे असं सांगतो आहे. प्रशासन आहे तर पत्रकारांची खूप गरज आहे. पत्रकार नसला तर प्रशासन बरोबर चालत नाही प्रशासन बरोबर चालल पाहिजे कामे व्यवस्थित केले पाहिजेत कामे चुकीचे होत असतील तर त्यांना जागवण्याच काम हे पत्रकार करीत असतात. पत्रकार समाजाचा आरसा आहे. हा आरसा पत्रकारांनी स्वच्छ ठेवायला पाहिजे. समाजाला जागविण्याच काम पत्रकार करीत असतात.
पत्रकारांनी बातम्या लीहताणा प्रत्येक गोष्टीचे सहानिशा करावे लागत असतात.

काय खोटं काय खर याची खात्री करून बातमी घेत असतात. त्यामुळं पत्रकारांच काम खूप मोठ असून एक समाजसेवा म्हणुन करीत असतात. पत्रकार हे अनेक गरीब गरजवंत शेतकरी शेतमजूर यांना योग्य न्याय देण्याचं काम आपल्या लेखणीमधुन करीत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या लेखणीमधुन समाजाला न्याय देण्याचं काम केल. असे यावेळी अध्यक्षीय भाषणात पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कोराम यांनी केले. संचालन बालू सातपुते, तर आभार प्रदर्शन योगेश सहारे यांनी केले. यावेळी व्हॉइस ऑफ मिडियाचे जिल्हा सदस्य प्रमोद राऊत, योगेश सहारे, भरत बंडे, राजु रामटेके, रामदास ठुसे, उमेश शंभरकर, जावेद पठाण, फिरोज पठाण, संजय नागदेवते, पंकज मिश्रा, राजेंद्र जाधव, शुभम बारसागडे, नितीन पाटील, गुणवंत चटपकर, जितेंद्र गाडगे, सुनील कोसे, विलास मोहिनकर, सुनिल हिंगणकर आदी तालुक्यातील व्हॉईस ऑफ मिडियाचे पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.