Home Breaking News Ghadchiroli dist@ news • गडचिरोलीच्या गांधी चौकात आयटकचे जवाब दो आंदोलन! •आशा...

Ghadchiroli dist@ news • गडचिरोलीच्या गांधी चौकात आयटकचे जवाब दो आंदोलन! •आशा वर्कर, गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी वेधले मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष!

200

Ghadchiroli dist@ news
• गडचिरोलीच्या गांधी चौकात आयटकचे जवाब दो आंदोलन!
•आशा वर्कर, गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी वेधले मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:संप काळात सरकारने केलेल्या घोषणा नुसार गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये , कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व दिवाळी बोनस. तसेच आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ देण्याचा जीआर तात्काळ काढावा,अंगणवाडी सेविकांना 26 हजार रूपये व मदतनीसला वीस हजार रुपये किमान वेतन, पेन्शन, ग्रॅज्युटी लागू करा.शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी मिळे पर्यंत 15 हजार रु.मानधन द्यावे .शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या घोषणे नुसार मासिक 1500 रू. मानधन वाढीचा जीआर काढावा आदिं प्रमुख मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले.गडचिरोली येथे 9 जानेवारी 2024 रोजी प्रशासनाच्या वतीने आयोजित महिला सक्षमीकरण मेळावा करिता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा नियोजित दौरा असल्याची माहिती आयटक पदाधिका-यांना मिळाल्याने त्यांना जाब विचारण्यासाठी गडचिरोली येथील गांधी चौकात आयटकच्या नेतृत्वात योजना कर्मचाऱ्यांचे जवाब दो!आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.परंतु आंदोलन करण्याच्या 1 दिवसापूर्वीच आयटकचे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांना सकाळीच ब्रम्हपुरी वरून तर जिल्ह्याधक्ष कॉ.देवराव चवळे यांना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले तदवतचं आंदोलन मागे घेण्याकरिता त्यांचेवर दबाव आणला जात होता .परंतु जो पर्यंत मुख्यमंत्री यांच्या सोबत भेट घडत नाही तो पर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी ताठ भूमिका आयटक पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने शेवटी पोलिस अधीक्षक यांनी मुख्यमंत्री सोबत भेट करून देणार असल्याचे मान्य केले. गांधी चौकातील राजीव गांधी पटांगणात सकाळी 11 वाजे पासून हजारों योजना कर्मचाऱ्यांनी जवाब दो !आंदोलनात सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली.शेवटी आयटकचे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.महेश कोपुलवार,कॉ.सरिता नैताम, कॉ.फर्जणा शेख, कॉ .वनिता कुंठावार,राधा ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन चर्चा केली. दि.18 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात आयटक महामोर्चात ठरल्या नुसार लवकरच मुंबई मंत्रालयात बैठक घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले .

जवाब दो!आंदोलनात आयटकचे कॉ.विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे कॉ.महेश कोपुलवार यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन करताना सरकारचा खरपूस समाचार घेतला.एकीकडे सरकारने दोन महिन्यापूर्वी संप काळात घोषणा करूनही आशा वर्कर, गट प्रवर्तक,कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ,दिवाळी बोनसचा जीआर काढायला वेळ नाही तर अंगणवाडी सेविकांचा गेल्या 36 दिवसांपासून राज्यव्यापी संप सुरू आहे परंतु शासनाने अद्याप तोडगा काढला नाही.

सरकार जवळ वेळ नाही, अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली नाही तेव्हा शापोआ कर्मचाऱ्यांनी मासिक 2500 रूपयांच्या मानधनात जगावे कसे? तेव्हा अश्या वेळकाढू कामगार विरोधी सरकारला येत्या 2024 मध्ये सत्तेवरून खाली खेचण्याचा व पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आयटकनी दिला आहे.आंदोलनात गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो आशा वर्कर गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका मदतनीस,शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होत्या.