Home Breaking News Chandrapur dist@ news • केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात -चंद्रपूरात स्टेरिंग छोडो आंदोलन!

Chandrapur dist@ news • केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात -चंद्रपूरात स्टेरिंग छोडो आंदोलन!

121

Chandrapur dist@ news
• केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात -चंद्रपूरात स्टेरिंग छोडो आंदोलन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:नविन हिट अँड रन कायदा कायद्यानुसार वाहन चालकावरील दहा वर्षांची शिक्षा व सात लाख रुपये दंडाची तरतुद तात्काळ रद्द करावी या प्रमुख मागणीसह अन्य काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी काल बुधवारी येथील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयटक प्रणित लाल बावटा वाहन चालक मालक चालक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.जो पर्यंत शासन हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.या पुढेही तीव्र आंदोलन करु असा इशारा काॅ.प्रकाश रेड्डी यांनी दिला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों वाहन चालक या आंदोलनात सहभागी झाले होते.तदंपूर्वि शहरात एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या धडक मोर्चात काॅ. रविन्द्र उमाठे, काॅ .प्रकाश रेड्डी,मुरुगन शेट्टी, कमलाकर टोंगे, मारोती बक्षी शिवशंकर गोंड,विनोद चांदेकर, नितीन कोलारकर,सचिन वनकर , सुनिल साठे, रघुनाथ धकाते,संतोष गोगुलवार,सुरेश नाननवरे,राजू गैनवार गणपत पुणेकर,महेश गुप्ता,सुरेश गुप्ता ,अनिल कांबळे,शंकर शेगमवार,संपत नाग ,आकाश दाते,पदमविर यादव ,राहुल विश्वकर्मा,अशोक यादव यांच्या सह शेंकडों वाहन चालक या मोर्चात सहभागी झाल्याचे दिसून आले.