Home Breaking News Chandrapur@ dist news • वन परिक्षेत्र वनविभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयाच्या रोखलेखा खर्च...

Chandrapur@ dist news • वन परिक्षेत्र वनविभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयाच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची एसटीआय व्दारे चौकशी करा -सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांची मागणी!

218

Chandrapur@ dist news
• वन परिक्षेत्र वनविभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयाच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची एसटीआय व्दारे चौकशी करा -सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांची मागणी!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर : जिल्ह्यातील वन परिक्षेत्र वनविभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयाच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची एसटीआय व्दारे चौकशी करावी अशी मागणी काल बुधवारी सामान्य कामगार चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय शामराव समर्थ यांनी एका लेखी निवेदनातून चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.उपरोक्त संदर्भात शिवणी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी दत्तात्रय समर्थ यांचे कडे एक लेखी तक्रार सादर केली होती.चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन सादर करताना काल गायकवाड यांच्यासह जेष्ठ नागरिक पुंडलिक गोठे हे प्रामुख्याने उपस्थित होते.या बाबत चंद्रपूर मुक्कामी गायकवाड यांनी मिळविलेल्या माहितीच्या अनुषंगाने झालेला प्रकार सांगितला व निःपक्षपाती चौकशीची मागणी केली.चौकशी झाल्यास गैरव्यवहार बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ते म्हणाले.