Home Breaking News ◾विशेष काव्यरचना◾ 🌼🌸मकरसंक्रांत🌼🌸 🔸🌼रजनी पोयाम भादिकर मु.पोस्ट – वणी...

◾विशेष काव्यरचना◾ 🌼🌸मकरसंक्रांत🌼🌸 🔸🌼रजनी पोयाम \भादिकर मु.पोस्ट – वणी जिल्हा-यवतमाळ ,सहज सुचलं सदस्य

421

◾विशेष काव्यरचना◾
🌼🌸मकरसंक्रांत🌼🌸

🔸🌼रजनी पोयाम \भादिकर
मु.पोस्ट – वणी जिल्हा-यवतमाळ ,सहज सुचलं सदस्य

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

जिंदगीचा ना भरोसा
किती दिस राहू…
समद्याशी गोड बोलू
तीयसं गुयसं खाऊ…\\१\\
तीय देते ताकद
गुय देते गोडवा
आनंदाचा हात धरा
अन दुःखाला पयवा…\\२\\
गोड बोला लोकाईशी
पण बोला मनातून
नैैतं वरुसण्या सोंग
आन दुष्मनी आतून…\\३\\
गोय बोलायची रीत
कई दिसली नाही
मतलबी गोडव्याला
गुयाची गरज नाही…\\४\\
जपा माणूसकी राजेहो
आनंद देऊन राहा शांत
मग हमेशाच होई
साजरी मकर संक्रांत…\\५\\