Home Breaking News Chandrapur dist@ news • रस्त्यासाठी जगदीश मेश्राम यांचे चंद्रपूरात अन्नत्याग उपोषण!

Chandrapur dist@ news • रस्त्यासाठी जगदीश मेश्राम यांचे चंद्रपूरात अन्नत्याग उपोषण!

262

Chandrapur dist@ news
• रस्त्यासाठी जगदीश मेश्राम यांचे चंद्रपूरात अन्नत्याग उपोषण!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:पांजरेपार रीठ ते आबामक्ता या रस्त्याला (विआर)नंबर व खनिजकर्म विकास निधीतून मंजूरी देण्यात यावी या मागणीसह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी भिम आर्मी संविधान दल चिमूर -वरोरा यांचे वतीने आज सोमवार दि.१५जानेवारी पासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आंदोलन मंडपात प्रामुख्याने जगदीश खटूजी मेश्राम हे उपोषणाला बसले असून अनेकांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला असल्याचे चंद्रकांत पिंपळकर,नत्थूजी पेंदाम, मोरेश्वर कावळे , पवन डोईजड ,अजित पिंपळकर,शुभम कावळे यांनी आमच्या प्रतिनिधीस आज संध्याकाळी सांगितले.जो पर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.दरम्यान उद्या शेंकडों महिला या आंदोलनात सहभागी होत असल्याचे खूद्द आंदोलनकर्ते जगदीश मेश्राम यांनी सांगितले.आमच्या मागण्या रास्त व योग्य असल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले.