Home Breaking News Chandrapur city@ news •मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करु शासनाला काॅ.रविंद्र...

Chandrapur city@ news •मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करु शासनाला काॅ.रविंद्र उमाठेंचा इशारा •अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आंदोलनाचा आजचा 48 वा दिवस! •शासन उदासिन -महिला कर्मचा-यांत उमटतो शासनाविषयी नाराजीचा सुर!

211

Chandrapur city@ news
•मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करु शासनाला काॅ.रविंद्र उमाठेंचा इशारा
•अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आंदोलनाचा आजचा 48 वा दिवस!

•शासन उदासिन -महिला कर्मचा-यांत उमटतो शासनाविषयी नाराजीचा सुर!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:अंगणवाडी सेविकांना २६ हजार रुपये वेतन तर मदतनीस यांना २०हजार रुपये वेतन मिळावे या शिवाय ग्रॅज्युटी व पेंशन लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा 48 वा दिवस असल्याचे बल्हारपूरच्या रेखा रामटेके यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले.दरम्यान आज बुधवारी स्थानिक बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) बल्हारपूर यांच्या कार्यालयासमोर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे ठिय्या आंदोलन सुरू असल्याचे दिसून आले शासनाने रास्त मागण्यांची दखल न घेतल्यास लवकरच हे आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा शासनाला काॅ.रविन्द्र उमाठे व काॅ.प्रकाश रेड्डी यांनी बल्हारपूर येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आंदोलनाला मार्गदर्शन करताना दिला या वेळी बल्हारपूर तालुक्यातील रेखा रामटेके,वर्षा आत्राम, रिता तितरे, लता लेनगुरे, मिरा बरमय्या, पंचशीला ताकसांडे, येशुका निमस्कार, ज्योति फुलझेले, रोशनी सोनटक्के, भावना खोब्रागडे, सिंधू ब्राह्मणे, सुषमा वासेकर, विजया वासनिक, आम्रपाली ताकसांडे, तारा माऊलीकर, सावित्री बगळे, संघमित्रा खोब्रागडे,सारीका उराडे, रेखा कांबळे,सुमन डेकाटे, वैशाली पिजदुरकर ,विद्या वासेकर,विद्या मेश्राम, मनिषा गांवडे,अल्का जगझापे,लता पेटकर, वंदना खेडकर, नाजुका गेडाम अन्नपूर्णा बोगुटावार मंगला मरापे,उषा मेंढे , निता बंसोड आदिं उपस्थित होत्या.