Chandrapur dist@ news
• रस्त्यासाठी होतेय गावकऱ्यांचे हाल ; प्रशासन करतेय दुर्लक्ष!
• जगदीश मेश्रामसह अन्य एकाचे चंद्रपूरात अन्नत्याग आंदोलन!
•आंदोलनचा आजचा 3 रा दिवस ;आपचे दिग्गज नेते सुनिल मुसळे यांची उपोषण मंडपाला भेट
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपूर:पांजरेपार रीठ ते आबामक्ता या रस्त्याला (विआर)नंबर व खनिजकर्म विकास निधीतून मंजूरी देण्यात यावी या मागणीसह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी भिम आर्मी संविधान दल चिमूर -वरोरा यांचे वतीने सोमवार दि.१५जानेवारी पासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून चंद्रपूर आप पार्टीचे दिग्गज नेते सुनिल मुसळे यांच्यासह पार्टीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी आज बुधवारी संध्याकाळी उपोषण मंडपाला भेट देत आंदोलन मंडपातील उपोषणकर्ते जगदीश खटूजी मेश्राम यांचेशी चर्चा करत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या अनेकांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला असल्याचे चंद्रकांत पिंपळकर,नत्थूजी पेंदाम, मोरेश्वर कावळे, पवन डोईजड ,अजित पिंपळकर,शुभम कावळे यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले.जो पर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.दरम्यान आज दुपारी ग्रामीण भागातील काही महिलांनी या उपोषण मंडपाला भेट देत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आंदोलनकर्ते जगदीश मेश्राम यांनी उपरोक्त मागण्यांसाठी बरेचदा वरिष्ठांकडे पाठपुरावा केला पण जिल्हा प्रशासनाने किंवा चिमूर , वरोरा तालुका प्रशासनाने या कडे लक्ष पुरविले नाही असे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे.प्रशासन आपल्या स्तरावरील या आवश्यक रास्त मागण्यांकडे का दुर्लक्ष करीत आहेत हे न उलगडणारे एक कोडेच आहे.