Home Breaking News Chimur taluka@ news • रामदेवबाबांना अटक करा ! • चिमूरात ...

Chimur taluka@ news • रामदेवबाबांना अटक करा ! • चिमूरात रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निषेध आंदोलन !

227

Chimur taluka@ news
• रामदेवबाबांना अटक करा !
• चिमूरात रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निषेध आंदोलन !

चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज)

गत काही दिवसांपासून मिडिया मध्ये बाबा रामदेव यांची एक क्लिप व्हायरल होत आहे.त्या मध्ये ते स्वतःला अग्निहोत्री ब्राह्मण समजून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत . एव्हढेच नाही तर ते ओबीसी समाजाची “ऐसी तैसी” हे शब्द उच्चारत ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्याचे दिसत आहे.त्यांच्या या कृत्या बाबत ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे. चिमूर येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघ कडून रामदेव बाबा यांचा निषेध नोंदविण्यात आला आहे.स्थानिक चिमूर तहसील कार्यालया समोर ओबीसी महासंघाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान रामदेव बाबा यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रामदेवबाबांच्या अश्या बोलण्यामुळे
ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत . निषेध आंदोलन करते वेळी
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चिमुर तालुकाध्यक्ष मारोतराव अतकरे, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ जिल्हा सहसचिव रामदास कामडी, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ चिमुर तालुकाध्यक्ष कवडू लोहकरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ युवा विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सातपुते, प्रभाकरराव पिसे,राजू लोणारे, संजय बावणकर ,जयदेव रेवतकर,ममता डुकरे, भावना बावणकर, वर्षा शेंडे, दुर्गा चावरे, समीर बल्की या शिवाय शेकडों ओबीसी बांधव उपस्थित होते.