Home Breaking News chandrapur dist @news • अभाविपच्या वतीने दर रविवारी राबविले जाणार स्वच्छता...

chandrapur dist @news • अभाविपच्या वतीने दर रविवारी राबविले जाणार स्वच्छता अभियान!

116

chandrapur dist @news
• अभाविपच्या वतीने दर रविवारी राबविले जाणार स्वच्छता अभियान!

चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज)

शहरातील वाढते प्रदूषण पाहता महाविद्यालय स्तरावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, चंद्रपूर महानगर यांच्या वतीने स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी रविवारी एकदिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल मंदिर वॉर्डातील वैष्णव देवी मंदिर संकुलालगत असलेल्या इराई नदीच्या काठावर स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्रातील ई-कचरा, प्लास्टिक संकलन व इत्तर कचरा गोळा करून तो महापालिकेच्या घंटागाडीत टाकला. रविवार फॉर चंद्रपूर अंतर्गत रविवारी महानगरात विविध ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी या वेळी दिली.
अभाविपचे चंद्रपूर जिल्हा संयोजक पियुष बनकर, महानगरमंत्री आदित्य गचकेश्वर, सहमंत्री कैवल्य तन्नीरवार, वंशिता कुकडे, एसएफडी संयोजक प्रेम घाटे, सहसंयोजक श्वेता तडसे, विद्या मेश्राम, तन्मय बनकर, ओंकार सायंकर, यश बक्षी, ओम जयस्वाल, विवेक शुक्ला, श्रीरंग खोंड, पायल माळवदे आदींनी या मोहिमेत भाग घेतला होता.