Home Breaking News Chandrapur city@ news • मृतक शिवा वझरकर परिवारांची भेट घेतली आ.किशोर...

Chandrapur city@ news • मृतक शिवा वझरकर परिवारांची भेट घेतली आ.किशोर जोरगेवार यांनी; चंद्रपूर पोलिस अधिक्षकांना दिल्या काही सुचना त्यांनी!

386

Chandrapur city@ news
• मृतक शिवा वझरकर परिवारांची भेट घेतली आ.किशोर जोरगेवार यांनी;चंद्रपूर पोलिस अधिक्षकांना दिल्या काही सुचना त्यांनी!

चंद्रपूर:किरण घाटे(सुवर्ण भारत)

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. दरम्यान आज चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या सरकार नगर मधील निवासस्थानी जात कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी आ.जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी यांना भ्रमनध्वनीवरुन संपर्क साधत काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहे. भेटी दरम्यान कॉंग्रेस नेत्या चित्रा डांगे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, शिवसेना महानगर प्रमुख भरत गुप्ता यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

गुरुवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान शिवा वझरकर सरकार नगर येथील अग्रवाल कोचिंग क्लाॅसेसजवळ एकाला भेटायला गेला होता. तिथे दोघांमध्ये चर्चा सुरू असताना आरोपी घटनास्थळी आला व शिवा वझरकर यांच्यावर त्याने चाकूने हल्ला केला.ह्या हल्ल्यात वझरकर हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत सरकार नगर येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तिथे उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरने त्यास मृत घोषित केले. घटनेनंतर सरकार नगर तुकुम येथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या नंतर पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना ताब्यात घेतले .

शनिवारी आमदार जोरगेवार यांनी शिवा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तद्वतच त्यांनी घडलेल्या घटनेची संपुर्ण माहिती जाणून घेतली. चंद्रपूर शहर हे अतिशय शांत शहर आहे. सदैव शांतता अबाधित राहिली पाहिजे.आपण या प्रकरणाची वरिष्ठ अधिका-यांकडून चौकशी करावी यासह अनेक महत्वपूर्ण सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक रविन्द्रसिंह परदेशी यांना केल्या आहे.