….. सुवर्ण युग……..
◾🌸सौ. ऋचा हनुमंत महाबळ, सहज सुचलं सदस्य सिंधुदुर्ग
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
◽🔸◽माझ्या भारत भूमीची
काय सांगू महती
विज्ञान प्रगतीचे युग
सारे आश्चर्याने पाहती
भारत भूमीची लेकर
देशासाठी प्राण अर्पिती
तिरंगा देशाचा फडकविण्या
प्राणाची आहुती देती
एकात्मतेचा घुमला नारा
श्रीरामाचे पुनरागमन झाले
चांद्रयान तीन यशस्वी होऊन
सुवर्ण युग सुखमयी आले
शौर्य क्रांती बलिदानाने
भारत भूमी आमची नटली
नव पिढी अद्यावत होऊनी
नव तंत्रज्ञानाने सजली
अनमोल रत्नांची खाण
पावन पवित्र जन्मभूमी
धन्य वाटे आम्हाला
कर्तृत्व शौर्याची ही कर्मभूमी
ऋण नाही फिटणार
पवित्र भारत भूमीचे
वंदन तुजला कोटी
द्यावे वरदान तूझ्या सेवेचे
