Home Breaking News Chandrapur dist@ news • दत्तात्रय समर्थ यांनी दिले होते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदन...

Chandrapur dist@ news • दत्तात्रय समर्थ यांनी दिले होते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदन • शिवणी येथील वनविभाग प्रकरणाची होणार चौकशी?

160

Chandrapur dist@ news
• दत्तात्रय समर्थ यांनी दिले होते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदन
• शिवणी येथील वनविभाग प्रकरणाची होणार चौकशी?

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्या अंतर्गत येत असलेल्या शिवणी वनपरिक्षेत्रातील रोखलेखा खर्च प्रमाणकेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा औद्योगिक काँग्रेस सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी केली होती.त्या प्रकरणाची आता वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार असल्याचे विश्वसानिय वृत्त आहे.
दरम्यान समर्थ यांनी या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे एक लेखी निवेदन काही दिवसांपूर्वी सादर केले होते.उपरोक्त प्रकरणाच्या अनुषंगाने शिवनी येथील मुरलीधर गायकवाड यांनी समर्थ यांचे कडे उपरोक्त प्रकरणाबाबत सविस्तर तक्रार सादर केली होती.