Home Breaking News Chandrapur dist@ news • स्काऊट -गाईडच्या माध्यमातून तरुणांचा बौद्धिक विकास होतो- आ....

Chandrapur dist@ news • स्काऊट -गाईडच्या माध्यमातून तरुणांचा बौद्धिक विकास होतो- आ. किशोर जोरगेवार •पदमापूर येथे स्काॅऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन

52

Chandrapur dist@ news
• स्काऊट -गाईडच्या माध्यमातून तरुणांचा बौद्धिक विकास होतो- आ. किशोर जोरगेवार
•पदमापूर येथे स्काॅऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:आपण इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या युगात जगत असतांना जिवनाच्या मूळ तत्वांकडून दुरावत जात आहोत. अशात स्काॅऊटिंग गाईडिंग ही एक विशिष्ट तरुण व्यक्तिमत्व विकास संस्था युवकांच्या जिवनाला दिशा देण्याचे काम करत आहे. एकंदर विचार केला असता स्काऊट्स गाईडसच्या माध्यमातून तरुणांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकास होत असल्याचे प्रतिपादन चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूर भारत स्काऊट गाईड, जिल्हा कार्यालय, बहुजन हिताय फाउंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पदमापूर येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. स्काऊटचे माजी मुख्यालय आयुक्त प्रा. सुर्यकांत खनके, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष रामपाल सिंग, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, दिलीप वावरे, विजयराव टोंगे, रुपा ताकसांडे, पद्मापूरच्या सरपंच उज्वला तापरे, संजय यादव, रुद्र नारायण तिवारी, शांताराम उईके, चंद्रकांत भगत, यशवंत हजारे, रंजाना किन्नाके आदिं मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, आजचा युवक मैदानी खेळापासून दूर जात आहे. त्यामुळे विद्यार्थी जीवनापासून त्यांच्यातील कला गुणांचा शोध घेत त्यांना आवड असलेल्या खेळांसाठी त्यांना प्रोत्साहित केल्या गेले पाहिजे. विद्यार्थांनी स्काॅऊट गाईड मध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला पाहिजे. यात जीवन जगण्याची पध्दतीचे शिक्षण दिल्या जाते ते भविष्यात विद्यार्थांना उपयुक्त ठरेल.
स्काॅऊट गाईड ही चळवळ ३ ते २५ वयोगटातील मुले, मुली, तरुण पुरुष आणि महिलांसाठी मानसशास्त्रावर आधारित प्रशिक्षण आणि क्रियाकलाप देते. त्यांच्या सर्वांगीण विकासात मदत करते आणि त्यांना स्थानिक, राष्ट्रीय, जबाबदार सदस्य बनण्यासाठी तयार करते. देशाचे एकनिष्ठ नागरिक राहून स्थानिक, राष्ट्रीय आणि जगभरात एकोपा, परस्पर आदर आणि सहकार्याचा प्रचार करण्याचे काम यातुन केल्या जात असल्याचे ते यावेळी म्हणाले. असे आयोजन आपण नियमीत केले पाहिजे हे समाज हिताचे कार्य असुन यासाठी लोकप्रतिनीधी म्हणून मी सदैव आपल्या पाठीशी असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला स्काऊट गाईडच्या सदस्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.