Ballarpur city@ news
• बल्लारपुर नगरीत मोठ्या प्रमाणात होणारी”वाळू विक्री” ही कायदेशीर की बेकायदेशीर? आपच्या रविकुमार पूप्पलवारांनी विचारला थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रश्न
चंद्रपूर : किरण घाटे
विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्लारपूर शहरात गत तीन-चार महिन्यांपासून घर बांधकामासाठी स्थानिक नागरिकांना मुबलक प्रमाणात रेती मिळत नसल्याची ओरड आहे. तद्वतच रेती अभावी येथील नागरिकांच्या घरांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पडलेले असल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे. घराचं बांधकाम करणारे मालक, बांधकाम करणारे कंत्राटदार व मजूर या वाळू पुरवठाच्या समस्येने अत्यंत त्रस्त झाले आहेत. याच शहरात कायदेशीररित्या वाळू उपलब्ध नाही .मात्र अवैध वाळू मुबलक प्रमाणात शहरात कशी येत आहे?, असा थेट सवाल पुप्पलवार यांनी उपस्थित केला आहे. याच नगरीत आजच्या स्थितीत जादा दराने अवैध रेतीची विक्री होत असल्याची चर्चा खुलेआम सुरू आहे . उपरोक्त अवैध रेती वाहतूकी कडे महसूल प्रशासन सोबतच पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे जनतेत बोलल्या जात आहे.
बल्लारपूर शहरातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,पोलिस प्रशासन व जिल्हा खनिकर्म विभागातील अधिकारी या कडे कानाडोळा करीत आहे असे पुप्पलवार यांचे म्हणणे आहे.शहरात व आजूबाजूच्या परिसरात अवैध रेती कुठून येते याचा शोध प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.शहरातील घरगुती बांधकामास शासनाने कायदेशीररित्या रेती उपलब्ध करून द्यावी अशी आप पार्टीचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांची मागणी आहे.
