Chandrapur city@ news
• वनपरिक्षेत्र वनविभाग कार्यालय शिवणीच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची चौकशी करा !
• मुरलीधर गायकवाड यांनी केली पत्रकार परिषदेतून मागणी!
चंद्रपूर :किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र वन विभाग प्रादेशिक शिवनी कार्यालयाच्या रोखलेल्या खर्च प्रमाणकेची एसटीआय द्वारे चौकशी करावी अशी मागणी शिवणी येथील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी आज शुक्रवार दि. २फेब्रुवारीला सिंदेवाही येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेतून केली आहे.त्यांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने या आधी वरिष्ठांकडे तक्रारी दाखल केल्या असून त्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलचे शहराध्यक्ष तथा सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांचे कडे देखिल तक्रार सादर केली आहे.दरम्यान समर्थ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे याच प्रकरणाबाबत तक्रार करुन सखोल चौकशीची मागणी केली आहे.
उपरोक्त प्रकरणात सविस्तर चौकशी केल्यास निश्चितच झालेला गैरप्रकार उघडकीस येईल असे तक्रारकर्ते मुरलीधर गायकवाड यांचे म्हणणे आहे.
