Home Breaking News …अखेर वर्षा राठोड यांना मिळाला न्याय ! चंद्रपूर जिल्हा समीतीच्या वतीने झाली...

…अखेर वर्षा राठोड यांना मिळाला न्याय ! चंद्रपूर जिल्हा समीतीच्या वतीने झाली पारदर्शकपणे निवड

198

…अखेर वर्षा राठोड यांना मिळाला न्याय !
चंद्रपूर जिल्हा समीतीच्या वतीने झाली पारदर्शकपणे निवड

चंद्रपूर :किरण घाटे

झानेरी व मालगुडा या गावातील आशा स्वयंसेविकेची झालेली निवड ही नियमबाह्य पद्धतीने दि. ३ जानेवारीला झाली होती. या बाबतीत वर्षा राठोड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदविला होता . दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पारदर्शकपणे फेर निवड व्हावी यासाठी जिल्हा समिती नेमून त्या बाबतीत चौकशी करावी अशी सूचना केली होती.त्या चौकशी नंतर वर्षा दयानंद राठोड यांना ख-या अर्थाने न्याय मिळत त्यांची निवड झाली. निवड समितीमध्ये डाॅ.संदिप गेडाम
डाॅ.स्वप्निल टेंभे डाॅ.गजेन्द्र अहिरकर शितल राजापूरे नंदा वैरागडे संध्या खोब्रागडे
संगिता कोटंबे आदिंचा समावेश होता.समितीने पारदर्शकपणे मुलाखत घेत राठोड यांची निवड केली.