nagbhid taluka@ news
• आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची नागभीड येथे आयोजित झाडे कुणबी समाजबांधवांचा स्नेहमिलन प्रबोधनात्मक सोहळा, गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार समारंभ
• आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा झाडे कुणबी समाजाच्या वतीने सत्कार
✍️अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड—दि. ४ फेब्रुवारी 2024 रोजी आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी रुक्मिणी सभागृह नागभीड, येथे झाडे कुणबी समाज संघटनेच्या वतीने आयोजित झाडे कुणबी समाजबांधवांचा स्नेहमिलन प्रबोधनात्मक सोहळा, गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी सर्व थोर संत महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तसेच, उपस्थित समाजबांधवांशी विविध विषयांवर संवाद साधून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार बंटीभाऊंच्या हस्ते विविध मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा झाडे कुणबी समाज संघटना तालुका नागभीड च्या वतीने श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिमा, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष – अॅड. गोविंदराव भेंडारकर, प्रमुख मार्गदर्शक – युवा प्रबोधनकार कवि व व्याख्याते गोंदिया मा. जितेन्द्रदादा आसोले, मा, श्यामजी पाथोडे अध्यक्ष नागभीड तालुका पञकार संघ, भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेशभाऊ तर्वेकर, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेशभाऊ पठाण, माजी बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिनभाऊ आकुलवार, भाजपा नेते तथा सरपंच ग्रा. पं. मेंढा आनंदभाऊ कोरे, भाजपा तालुका महामंत्री सुनिलभाऊ शिवणकर, नागभीड कृ.उ.बा. समिती संचालक नरेंद्रभाऊ हेमणे, अध्यक्ष दक्षता समिती न.प. नागभीड रामदासभाऊ बहेकार, अध्यक्ष – झाडे कुणबी पुरुष बचत गट अनिलजी बहेकार, अध्यक्षा – शताऊ महिला बचत गट नागभीड रुपालीताई कठाणे, ज्ञानेश्वरजी भेंडारकर, रुपालीताई पाथोडे, झाडे कुणबी समाज नागभीड कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष – सचिन कठाणे, उपाध्यक्ष – यादवराव गायधने, सचिव – सुरज भेंडारकर, कोषाध्यक्ष – विजय भेंडारकर, सहसचिव – शिरीष (बबलु) शिवणकर, सहसचिव – गुरुदेव शिवणकर, सहसचिव – रितेश कोरे, शुभम चिल्लूरे, शुभम येरणे व अन्य मान्यवर आणि झाडे कुणबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




