Home Breaking News Sindevahi taluka@ news • गावात होते अवैध दारूची विक्री महिलांमध्ये आक्रोश ;...

Sindevahi taluka@ news • गावात होते अवैध दारूची विक्री महिलांमध्ये आक्रोश ; पोलिस पाटील गप्प ? उपविभागीय अधिकारी “त्या” पोलिस पाटलावर कारवाई करतील काय?

183

Sindevahi taluka@ news
• गावात होते अवैध दारूची विक्री महिलांमध्ये आक्रोश ; पोलिस पाटील गप्प ? उपविभागीय अधिकारी “त्या” पोलिस पाटलावर कारवाई करतील काय?

सिंदेवाही :किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्याच्या
सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील महिलांनी गावात अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी कंबर कसली असून या बाबतीत त्यांनी वरिष्ठांकडे निवेदन सादर केल्याचे वृत्त आहे.गावात कायदा,सुव्यवस्था व शांतता नांदावी यासाठी गावातील महिलांनी हे पाऊल उचलले आहे.गावात पोलिस पाटील असून देखील ते अद्याप गप्प का बसले या मागचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.विशेष म्हणजे गावात या पोलिस पाटलाच्या बाबतीत सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान सोमवार दि. 5 नोव्हेंबर रोजी पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी दारू बंदी समितीच्या महिलांची भेट घेतली व त्यांच्या भावना व समस्या जाणून घेतल्या .

उपविभागीय अधिकारी चिमूर व सिंदेवाही तहसिलदार यांनी या गावातील अश्या या निष्क्रिय पोलिस पाटलास तातडीने निलंबित करावे अशी मागणी या परिसरातील महिला वर्गाकडून होत आहे.