◽– -अशी होती रमाई—◽
🔲कु. मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं सदस्य 🔲ठाणे◽
किरण घाटे: चंद्रपूर
भीमाची सावली
साधी अन् भोळी
रमाई माऊली
लावी कुंकू भाळी //१//
असे मायेचा सागर
सर्वांना देई स्फूर्ती
भीमा पाटी उभी
ध्येयशील त्यागमूर्ती //२//
जिद्दी अन् स्वाभिमानी
करूणेची असे सरिता
दिनदुबळ्यांची झाली
पहा रमाई माता //३//
अशा माऊलीला नमस्कार
गरिबीत केला संसार
भीमाची न सोडली साथ
दुःख सोसले अपार. //४//


