Chandrapur dist@ news
• शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी चंद्रपूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांचे लाक्षणिक उपोषण!
चंद्रपूर:किरण घाटे
चंद्रपूर:येलो मोझॅक, बोंड अळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन कापूस या शिवाय अन्य पिकांच्या झालेल्या नुकसानपोटी एकरी दहा हजार रुपये देण्यात यावे ,सोयाबीनला प्रति क्विंटल किमान नव हजार रुपये व कापसाला प्रति12 हजार पाचशे रुपये भाव देण्यात यावा चालू वर्षाची पीक विम्याची अग्रीम व 100% पीक विमा भरपाई देण्यात यावी,विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता अनुदान द्यावा, वन्यप्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतीला सौर ऊर्जेचे नाही तर तारेचे व सिमेंटचे पक्के कंपाऊंड देण्यात यावे खाद्य तेलावरील आयात शुल्लक 30 टक्के करण्यासाठी कापूस व सुत निर्यातीत प्रोत्साहन द्यावे ,जीएम सोयाबीन व कापसाला भारतात लागवड करण्याची परवानगी मिळावी ,तरुणांना हक्काचा रोजगार द्यावा , तेलबियावरील जीएसटी रद्द करण्यात यावी,शेतीला पूर्णवेळ मोफत वीज द्यावी ,महिला बचत गटांच्या कर्जमाफी करावी,शेतमजुरांना विमा सुरक्षा व मदत मिळावी ,भुमीहीनांना कायमचे पट्टे द्यावे ,दूध उत्पादकांना अनुदान द्यावे आदिं शेतकरी बांधवांच्या रास्त मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला शहरातील अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे . सदरहु लाक्षणिक उपोषणातून मागण्यांची पूर्तता न झाल्यास आपण अधिक तीव्र आंदोलन करु असे सुर्या अडबाले यांनी आज संध्याकाळी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.दरम्यान मागण्यांचे एक लेखी निवेदन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंडे,चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविले आहे.शेतक-यांच्या रास्त मागण्या, प्रश्न व अन्य समस्यांसाठी आपण हे लाक्षणिक उपोषण सुरू केले असल्याचे ते म्हणाले.
