Home Breaking News Chandrapur city@ news • आरक्षण बचावसाठी चंद्रपूरात निघाला भव्य मोर्चा!

Chandrapur city@ news • आरक्षण बचावसाठी चंद्रपूरात निघाला भव्य मोर्चा!

116

Chandrapur city@ news
• आरक्षण बचावसाठी चंद्रपूरात निघाला भव्य मोर्चा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:आरक्षण बचावसाठी काल बुधवारला दुपारी १२वाजता स्थानिक गांधी चौकातून एक भव्य मोर्चा निघाला.सदरहु मोर्चाचे आयोजन ओबीसी, (व्हीजे.एनटी .एसबीसी‌) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या वतीने केले होते. उपरोक्त मोर्चा शहरातील जयंत टाॅकीज, जटपूरा गेट ,व प्रियदर्शिनी चौक होत तो स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरसमोर धडकला या वेळी काही मान्यवर मंडळींनी मोर्चाला संबोधित केले.त्यानंतर एका शिष्टमंडळाने चन्द्रपूरचे जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे एक निवेदन सादर केले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेंकडों नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.कायदा शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून पोलिस प्रशासनाने शहराच्या काही मुख्य मार्गांवर व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.