Home Breaking News Chandrapur dist@ news • चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले चौकशी करण्याचे...

Chandrapur dist@ news • चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले चौकशी करण्याचे मुख्य वनसंरक्षक यांना पत्र! • वनविभाग शिवणी येथील रोखलेखा खर्च प्रमाणकेची सखोल चौकशी करण्याची दत्तात्रय समर्थ यांनी केली होती मागणी !

55

Chandrapur dist@ news
• चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले चौकशी करण्याचे मुख्य वनसंरक्षक यांना पत्र!
• वनविभाग शिवणी येथील रोखलेखा खर्च प्रमाणकेची सखोल चौकशी करण्याची दत्तात्रय समर्थ यांनी केली होती मागणी !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर :जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र वन विभाग प्रादेशिक शिवनी कार्यालयाच्या रोखलेल्या खर्च प्रमाणकेची एसटीआय द्वारा चौकशी करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलचे शहराध्यक्ष तथा सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एका लेखी निवेदनातून काही दिवसांपूर्वी केली होती.तदवतचं समर्थ यांनी या तक्रारीची एक प्रत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे कडे सादर केली होती.त्याच तक्रारीच्या अनुषंगाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांना चौकशी करण्यासाठी नुकतेच एक पत्र दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
उपरोक्त प्रकरणात सखोल व सविस्तरपणे चौकशी झाल्यास त्या विभागात झालेला गैरप्रकार उघडकीस येवू शकते असे शिवणीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांचे स्पष्ट म्हणणे आहे.दरम्यान त्यांनी या बाबतीत सिंदेवाहीला एक पत्रकार परिषद घेवून पत्रकारांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली होती.येत्या नव तारखेला दत्तात्रय समर्थ मुंबईला जात असून मुख्यमंत्री यांना या बाबतीत परत एक निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.