Home Breaking News Chandrapur city@ news • आ. किशोर जोरगेवारांनी पुढाकार घेवून- ले आउट धारकाने...

Chandrapur city@ news • आ. किशोर जोरगेवारांनी पुढाकार घेवून- ले आउट धारकाने अडविलेला मार्ग मोकळा करुन दिला • गावकऱ्यांनी व्यक्त केले समाधान:पक्का रस्ता बनविण्यासाठी देणार निधी !

248

Chandrapur city@ news
• आ. किशोर जोरगेवारांनी पुढाकार घेवून- ले आउट धारकाने अडविलेला मार्ग मोकळा करुन दिला

• गावकऱ्यांनी व्यक्त केले समाधान:पक्का रस्ता बनविण्यासाठी देणार निधी !

चंद्रपूर :किरण घाटे (सुवर्ण भारत)

खुटाळा येथील लवजी नगर कडे जाणा-या मार्गात एकाचे ले – आउट असल्याने त्या लेआऊट मालकाने गावांकडे जाणारा मार्ग अडविला होता. त्यामुळे गाव-यांना मोठी अडचण निर्माण झाली होती. दरम्यान चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी तो रस्ता गावक-यांसाठी आता मोकळा करुन दिला आहे. या शिवाय येथे पक्का रस्ता तयार करण्यासाठी निधी देणार असल्याचे संबंधित गावकऱ्यांना सांगितले.
खुटाळा येथे लहुजी नगर आहे. गेल्या 40 वर्षांपासून सदर गाव येथे असून या गावाकडे जाणारा एक मुख्य मार्ग आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सदरहु मार्ग आपल्या ले – आउट मध्ये असल्याचे सांगत ले – आउट धारकाने गावक-यांचा जाण्याचा रस्ताच बंद केला होता. अशातच गावक-यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. या गावातील एका मुलीची प्रकृती बिघडली होती तीला रुग्णालयात नेण्यासाठी सदरहू मार्गाचा वापर करु दिल्या गेला नाही असा आरोप गावक-यांनी केला आहे. ही बाब कळताच आज रविवारला आमदार जोरगेवार यांनी सदरहु गावाला भेट देत गावक-यांची समस्या जाणून घेतली. यावेळी संबधीत ले – आउट धारकाला बोलावून त्याची समज काढण्यात आली . सदरहु मार्ग पुन्हा गावक-यांसाठी आता मोकळा करण्यात आला आहे.
तसेच सदरहु मार्गाचे पक्के बांधकाम करण्यासाठी आवश्यक तितका निधी आपण उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही यावेळी आमदार जोरगेवार यांनी गावक-यांना दिली . गावाकडे जाण्याचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही. यापुढे असा प्रकार घडता कामा नये. असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्वांसमक्ष सांगितले . गावक-यांनीही आमदार जोरगेवार यांचे आभार मानले आहे. या वेळी यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, जय मिश्रा यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची आणि गावक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.