Gondpipari taluka @news
• आ.सुभाष धोटेंनी घेतले कोंडय्या स्वामींचे दर्शन…!!
✍️संतोष झाडे
सुवर्ण भारत:विशेष प्रतिनिधी , चंद्रपूर
संपर्क : 9730526497
गोंडपिपरी (धाबा):- राजुरा विधानसभा आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुका दौरा केला. दौऱ्या दरम्यान संतनगरी धाबा परिसराचे आराध्य दैवत श्री संत परमहंस कोंडय्या महाराज जन्मोत्सव व यात्रा महोत्सव सोहळ्यात उपस्थिती दर्शवून स्वामींचे दर्शन घेतले व विधिवत पूजा केली.आमदारांनी परमहंसाचे पुजारी सेगमवार महाराजांकडून तीर्थ प्राशन करून आशीर्वाद घेतला.संस्थानचे विश्वस्त पदाधिकाऱ्यांनी आमदारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
व महाराजांनी गाथा भेट दिली.सोबतच सहकारी पदाधिकाऱ्यांचे सुद्धा स्वागत करून कोंडय्या स्वामींच्या गाथा पुस्तिका भेट दिल्या.
यावेळी गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, पोडसाचे सरपंच देविदास सातपुते, युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष संतोष बंडावार,धाबा गावचे माजी सरपंच नामदेव सांगडे, विनोद नागापुरे, अनिल कोरडे,जितेंद्र गोहणे,प्रकाश हिवरकर, उपसरपंच कवडू कुबडे, सरपंच गिरीधर कोटनाके, संतोष मुप्पिडवार, येनमपल्लीवार,आनंदराव कोडापे, गजानन पाल, प्रदीप खारकर,भिवसन चहारे, नवराज चंद्रागडे,नितेश घ्यार, गौतम बारसागडे, संस्थांचे विश्वस्त पदाधिकारी आदी उपस्थित होते.
