chandrapur city @news
• आशा वर्कर व गटप्रवर्तकांच्या ठिय्या आंदोलनाचा आज 33 वा दिवस !
• शासनाने अद्याप दखल घेतली नाही ; आशा वर्कर करणार आता आंदोलन अधिक तीव्र!
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत: सहसंपादक
आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे रास्त मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून चंद्रपूर जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी देखील या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला आहे.दरम्यान चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या गेल्या काही दिवसांपासून ठिय्या आंदोलन करीत आहे.
या आंदोलनाचा आज 33 वा दिवस असून मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती काॅ.रविन्द्र उमाठे यांनी आज बुधवारी चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान दिली आहे. मागण्यांची पूर्तता तातडीने न झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यात आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा काॅ. रविन्द्र उमाठे काॅ.प्रकाश रेड्डी व नेहा जगताप यांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.
