Home Breaking News Chandrapur city@ news • रोखठोक प्रहार कामगार संघटनेचा अशिद मेश्राम करतोय गनिमी...

Chandrapur city@ news • रोखठोक प्रहार कामगार संघटनेचा अशिद मेश्राम करतोय गनिमी कावा आंदोलन !

89

Chandrapur city@ news
• रोखठोक प्रहार कामगार संघटनेचा अशिद मेश्राम करतोय गनिमी कावा आंदोलन !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालूक्यातील काग गावातील काही आवश्यक व रास्त मागण्यांसाठी प्रहार कामगार संघटनेचा चिमूर तालूका प्रमुख अशिद मेश्राम येत्या १९फेब्रूवारीला काग मुक्कामी सकाळी ११वाजता गनिमी कावा आंदोलन करीत आहे.अशी माहिती खुद्द मेश्राम यांनी या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

चिमूर आठवडी बाजार बाबत त्यांचा महत्वाचा प्रश्न असून या बाबतीत त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना मागण्यांचे एक लेखी निवेदन नुकतेच सादर केले आहे.निवेदन देतांना प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे या वेळी उपस्थित होते.वारंवार मेश्राम यांनी नगर परिषद चिमूर यांना रास्त मागण्यांच्या बाबतीत निवेदन सादर केले पण चिमूर नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कडे जातीने लक्ष पुरविले नाही .त्यामुळे गनिमी कावा आंदोलन करण्याची परिस्थिती अशिद मेश्राम यांचेवर आली आहे असे प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक महेश हजारे म्हणाले.