Home Breaking News Chandrapur taluka@ news • रेल्वे प्रशासन पडोलीतील शेकडों नागरिकांच्या झोपड्या हटविणार !...

Chandrapur taluka@ news • रेल्वे प्रशासन पडोलीतील शेकडों नागरिकांच्या झोपड्या हटविणार ! •अनेकांना दिले नोटीस!

174

Chandrapur taluka@ news
• रेल्वे प्रशासन पडोलीतील शेकडों नागरिकांच्या झोपड्या हटविणार !
•अनेकांना दिले नोटीस!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली येथे गत ३० ते ४० वर्षांपासून वास्तव्याने असलेल्या गरीब कुटुंबाच्या झोपड्या हटविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.सदरहु झोपड्या असणारी जागा ही रेल्वे प्रशासनाची असल्याचे बोलल्या जाते.या ठिकाणी ३५०ते ४००लोकांच्या झोपड्या उभ्या असून तिथे ब-याच वर्षांपासून लोक राहत असल्याची माहिती महिला सामाजिक कार्यकर्त्या मीना माणूसमारे यांनी या प्रतिनिधीस दिली.

दरम्यान काही जणांना या संदर्भात नागपूर रेल्वे प्रशासना कडुन नोटीस देण्यात आले आहे.

आम्हाला निवासासाठी प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी या झोपडपट्टी वासियांची एकमुखी मागणी आहे.या वस्तीत अंदाजे २००० हजार लोक राहत आहेत.काल बुधवारी याच संदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी विनय गौडा यांना एक लेखी निवेदन देण्यात आले.या वेळी पडोली निवासी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी ,या शिवाय मीना माणूसमारे, कल्पना घूमे , दुर्गा बावणे, सविता ठाकूर, बिट्टू पड्डा,राणी यादव , सविता आत्राम, सुलोचना टोंगेसह अनेक महिला उपस्थित होत्या.