Home Breaking News chandrapur city @news • टोल कंपनी व बांधकाम विभागाच्या विरोधात येत्या २०...

chandrapur city @news • टोल कंपनी व बांधकाम विभागाच्या विरोधात येत्या २० फेब्रूवारीला आम आदमी पार्टी करणार चंद्रपूरात रास्ता रोको आंदोलन

141

chandrapur city @news
• टोल कंपनी व बांधकाम विभागाच्या विरोधात येत्या २० फेब्रूवारीला आम आदमी पार्टी करणार चंद्रपूरात रास्ता रोको आंदोलन

चंद्रपूर: किरण घाटे

चंद्रपूर बल्लारशाह राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण अधिक वाढल्याने त्याठिकाणी अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अश्यातच याच महामार्गांवर अष्टभुजा बाबूपेठचा मध्यभागी रेल्वे ओवर ब्रिजचे काम टोल कंपनीला रेल्वे प्रशासनाची परवानगी भेटून सुद्दा ते काम पूर्ण न केल्याने अनेक प्रवाश्यांना आपला प्राण गमवावा लागला व लागत आहे. या महामार्गावर सर्विस रोड नसल्याने स्मशान भूमिकडे प्रेत यात्रा नेणाऱ्या लोकांच्या गर्दीला याचा धोका निर्माण झाला असून केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते. तद्वतच सर्व्हिस रोड नसल्याने रोड वरती उभ्या असलेल्या ट्रक मुळे सुद्दा अपघात घडत आहे.

आपली नैतिक जबाबदारी सोडून जनतेकडून सर्रास टॅक्स वसुली करणाऱ्या विसापूर येथील WCBTRL कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून भविष्यात होणाऱ्या अपघाताची जिम्मेदारी टोल कंपनीने स्विकारावी व तात्काळ पुलाचे काम सुरू करावे दरम्यान उपरोक्त मागण्यांसाठी येत्या २० तारखेला ठीक 11 वाजता अष्टभूजा , रेल्वे ओवर ब्रिज वरती रास्ता रोको आंदोलन आम आदमी पक्षांच्या वतीने करीत असल्याची माहिती आपचे जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दिली आहे.