Home Breaking News chandrapur city@ news • विविध मागण्यांसाठी चंद्रपूरात निघाला आयटकचा भव्य आक्रोश...

chandrapur city@ news • विविध मागण्यांसाठी चंद्रपूरात निघाला आयटकचा भव्य आक्रोश मोर्चा ! • मोर्चात आशा वर्कर व गटप्रवर्तकांची उपस्थिती लक्षणिय

184

chandrapur city@ news
• विविध मागण्यांसाठी चंद्रपूरात निघाला आयटकचा भव्य आक्रोश मोर्चा !
• मोर्चात आशा वर्कर व गटप्रवर्तकांची उपस्थिती लक्षणिय

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर शहरात शुक्रवारी आयटकच्या वतीने एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .हा भव्य मोर्चा दुपारी १२ वाजता स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मेन रोड चंद्रपूर येथून निघून तो थेट चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला . भव्य आक्रोश मोर्चाचे नेतृत्व आयटकचे नेते काॅ. रविन्द्र उमाठे ,प्रकाश रेड्डी , राजू गैनवार,एन.टी. म्हस्के,प्रकाश वानखेडे, आदिंनी केले. आयोजित केलेल्या मोर्चात आशा वर्कर, गट प्रवर्तक , शालेय पोषण आहार कर्मचारी,बालवाडी अंगणवाडी कर्मचारी,राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी ,महाराष्ट्र राज्य किसान सभा,बांधकाम कामगार ,कोळसा उद्योगातील संयुक्त खदान मजदूर संघ , महा.राज्य .विद्युत वर्कर फेडरेशनचे कर्मचारी सहभागी झाले होते.चंद्रपूर आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष काॅ.रविन्द्र उमाठे यांच्यासह अन्य पदाधिका-यांच्या एका शिष्टमंडळाने संध्याकाळी जिल्हाधिकारी यांना एक मागण्यांचे निवेदन सादर केले.

ह्यात एकूण १२मागण्यांचा अंतर्भाव होता.विशेष म्हणजे मोर्चात आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी वर्गांची उपस्थिती लक्षणीय अशीच होती.आक्रोश मोर्चातील घोषणाबाजीने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील वातावरण दुमदुमले होते.