Home Breaking News ⏹️छ्त्रपती शिवबा …. 🔸🔸सौ.वैजयंती विकास गहूकर योगा टीचर चंद्रपूर...

⏹️छ्त्रपती शिवबा …. 🔸🔸सौ.वैजयंती विकास गहूकर योगा टीचर चंद्रपूर vaijugahukar@gmail.com🔸 संकलन -उज्वला निमगडे दुर्गापूर

224

⏹️छ्त्रपती शिवबा ….

🔸🔸सौ.वैजयंती विकास गहूकर योगा टीचर चंद्रपूर
vaijugahukar@gmail.com🔸 संकलन -उज्वला निमगडे दुर्गापूर

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

🟨🔸🟧भोसले घराण्याची शान तू
जिजाऊ मातेचा पुत्र तू
शूरवीर पराक्रमी तू
शिवबा राजा छत्रपती तू //

केली स्वराज्याची स्थापना
खेळूनी बुध्दीचा खेळ तू
शिस्तबद्ध लष्कर तुझे
सामर्थशाली राज्यांचा स्थापक तू //

गनिमी काव्याचे तंत्र तुझ्याकडे
केला मुघलांचा पराभव तू
शूरवीर पराक्रमी
शहाजीचा पुत्र तू

सई बाईचा धनी तू
संभाजी,राजाराम चा पिता तू
शूरवीर निष्ठावंत
मराठी मावळ्यांचा रक्षक तू //

भाग्यशाली तू शिवबा
गुरू तुझी ती माऊली
शत शत नमन त्या जननीला
छत्रपती शिवराया तुझ्या जन्मदिनी //