Home Breaking News • भाजप युवा नेते प्रफुल कोलतेंच्या “गांव चलो अभियानला “मिळाला उत्स्फूर्त ...

• भाजप युवा नेते प्रफुल कोलतेंच्या “गांव चलो अभियानला “मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; अनेकांच्या घेतल्या कोलते यांनी भेटी

138

• भाजप युवा नेते प्रफुल कोलतेंच्या “गांव चलो अभियानला “मिळाला उत्स्फूर्त
प्रतिसाद ; अनेकांच्या घेतल्या कोलते यांनी भेटी

चंद्रपूर:किरण घाटे

काल गुरुवार दि. 15 फेब्रुवारीला भाजपाचे युवा नेते प्रफुल कोलते यांनी भाजपाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‛गांव चलो अभियान’ या अंतर्गत हिरापूर बूथ क्रमांक 91 मध्ये मनोज सोगलकर यांच्या घरी प्रवासी कार्यकर्ता म्हणून भेट दिली तद्वतच पक्ष कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला.या प्रसंगी बूथ क्रमांक 91 हिरापूर मधील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित ग्रामस्थांना केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची तथा विकासकामांची सविस्तर माहिती त्यांनी दिली.

अभियानात बूथ अध्यक्ष मनोज सोगलकर,अतुल बावनकर,रामदास राणे,शेखर आदे,ब्रमानंद पंचवटे,अशोक हटोलकर,पुंडलिक ननावरे,मंदा उरकुडे,बंडू पोहनकर,सोमेश्वर गुरनुले,भाष्कर राणे,माधव हटोलकर, अरुण बघिले,तानाजी बावनकर,गुरुदेव सालवटकर,प्रवीण ढोक,संतोष हटोलकर,कुसुम हटोलकर,लता हटोले,या शिवाय अन्य कार्यकर्तागण उपस्थित होते.गावातील नागरिकांची भेट घेऊन त्यांना योजनेची माहिती देण्यात आली. एकंदरीत प्रफुल कोलते यांच्या गाव चलो अभियानला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.