Home Breaking News चंद्रपूरात मराठा सेवा संघाच्या वतीने येत्या १९ तारखेला शिवजयंतीचे भव्य आयोजन

चंद्रपूरात मराठा सेवा संघाच्या वतीने येत्या १९ तारखेला शिवजयंतीचे भव्य आयोजन

137

चंद्रपूरात मराठा सेवा संघाच्या वतीने येत्या १९ तारखेला शिवजयंतीचे भव्य आयोजन

चंद्रपूर :किरण घाटे

मराठा सेवा संघ जिल्हा चंद्रपूर दरवर्षी १९ फेब्रुवारी हा शिवजन्मोत्सवाचा दिवस लोकोत्सव म्हणून साजरा करतात.या वर्षीही देखील सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ ला स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे सायंकाळी ६.३० वाजता शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले असून “छत्रपती शिवरायांचे महिलांविषय धोरण आणि सध्याचे वास्तव” या विषयावर प्रसिध्द व्याख्यात्या जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षा सिमाताई बोके मार्गदर्शन करणार आहे. शिवजयंती महोत्सव निमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी चंद्रपूर गौरव पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात गौरवपूर्ण काम करणाऱ्यांना दिला जातो.यावर्षीच्या चंद्रपूर गौरव पुरस्काराचे मानकरी म्हणून इको प्रो संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष बंडूभाऊ धोत्रे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना चंद्रपूर गौरव पुरस्कार-२०२४ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवजयंती महोत्सव आणि जाहीर व्याख्यान समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठा उद्योजक कक्ष चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संतोष कुचनकर, उद्घाटिका म्हणून रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबुपेठ चंद्रपूरच्या अध्यक्षा चंदा वैरागडे असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक जेऊरकर, मराठा सेवा संघ चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष इंजि. दीपक खामनकर, जिजाऊ ब्रिगेड चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षा अर्चना चौधरी, संभाजी ब्रिगेड चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष विनोद थेरे, संभाजी ब्रिगेड चंद्रपूर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लता होरे, चंद्रपूर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ मा.डॉ. प्रिती बांबोडे, जनता डि.एड. कॉलेज चंद्रपूरच्या प्राचार्या शुभांगी आसुटकर, चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भेदे यांची उपस्थिती राहणार आहे.भव्य शिवजयंती महोत्सव तसेच जाहीर व्याख्यान समारंभ कार्यक्रमाकरिता बहुसंख्येने सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन मराठा सेवा संघ चंद्रपूर यांच्या कडून करण्यात आले आहे.