Home Breaking News Chimur Taluka@ News • अशिद मेश्रामच्या गनिमी कावा आंदोलनचा धसका; चिमूर नगर...

Chimur Taluka@ News • अशिद मेश्रामच्या गनिमी कावा आंदोलनचा धसका; चिमूर नगर परिषदेची झोप उघडली

215

Chimur Taluka@ News
• अशिद मेश्रामच्या गनिमी कावा आंदोलनचा धसका; चिमूर नगर परिषदेची झोप उघडली !

चंद्रपूर: किरण घाटे

गत तीन महिन्यांपूर्वी रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे चिमूर तालूका प्रमुख अशिद मेश्राम यांनी काग गावातील विविध समस्या व काही आवश्यक मागण्यांच्या संदर्भात निवेदन सादर केले होते .पण चिमूर नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबींकडे पूर्णतः दुर्लक्ष केले.

शेवटी ग्रामीण भागातील एक युवा नेता तथा प्रहार कामगार संघटनेचा अशिद मेश्राम यांनी गनिमी कावा आंदोलन करण्याचे दोन आठवड्यांपूर्वी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांना लेखी निवेदन सादर केले होते.दोन तिन दिवसांपासून चिमूर नगर परिषदेचे एक सफाई पथक काग गावात दाखल झाले .सध्या नाल्यासफाई करण्याचे काम सुरू झाले आहे.परंतु अद्याप गांव पातळीवरील महत्त्वाच्या काही मागण्या शिल्लक असल्यामुळे अशिद मेश्राम यांनी उद्या( सोमवार दि.१९ फेब्रुवारीला) काग मुक्कामी आंदोलन करण्याचा आपला संकल्प कायम ठेवला आहे.