Home Breaking News Chandrapur dist@ news • चंद्रपूर जिल्ह्यातील हत्याकांड ! •दोन दिवसांत तीन...

Chandrapur dist@ news • चंद्रपूर जिल्ह्यातील हत्याकांड ! •दोन दिवसांत तीन हत्या ; आरोपींना कठोर शिक्षा द्या -राजू झोडेंची पोलिस अधिक्षकांकडे मागणी

263

Chandrapur dist@ news
• चंद्रपूर जिल्ह्यातील हत्याकांड !
•दोन दिवसांत तीन हत्या ; आरोपींना कठोर शिक्षा द्या -राजू झोडेंची पोलिस अधिक्षकांकडे मागणी

चंद्रपूर :किरण घाटे

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यात गत दोन दिवसांत तीन हत्याकांड घडले असून जिल्हा पूर्णतः हादरून गेला आहे.गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसांगणिक डोके वर काढत आहे . सध्या पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दृष्टीक्षेपात पडत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागात घडलेल्या तिन्ही हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे केली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात पतीनेच आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली, तर बल्लारपूर शहरात प्रेमप्रकरणातून तरुणीची तरुणाने अमानुषपणे हत्या केली.या दोन्ही घटनेच्या बातमीची शाई सुकत नाही तोच शनिवारी चंद्रपूर शहरातील अष्टभुजा येथे धारधार शस्त्राने गळा चिरून एका युवकाची हत्या करण्यात आली असल्याची घटना घडली.सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले असून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे एकंदरीत दिसते.एव्हढेच नाही तर स्थानिक पोलिस प्रशासन सुद्धा आरोपींपर्यंत पोहचण्यास असफल होत आहेत.त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आता पोलीस अधिक्षकांनी याकडे जातीने लक्ष पुरवावे . तद्वतच जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांना गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश द्यावेत व जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश लावावा अशी मागणी देखील झोडे यांनी केली आहे.