◆सुचत नाही काही
🔸🌼सौ.वैजयंती विकास गहूकर योगा टीचर
🌼
🔸संकलन-उज्वला निमगडे दुर्गापूर चंद्रपूर
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
अस कस जीवन हे
सुचत नाही काही //
कसा तू जीवनी आला
कळत नाही काही //
उन्हात पाऊस पावसात ऊन
समजत नाही काही //
कसा हा जीवनाचा
चढ उतार
उमगत नाही काही //
जीवनाचे सत्य
सांगत नाही कोणी //
असा तू अशी मी
भेद नाही काही //
कस हे प्रेम वेड
कळत नाही काही //
मनातला भाव
ओळखत नाही कोणी //
संकट समयी
सोबत नाही कोणी //
असं कसं जीवन हे
सुचत नाही काही
सुचत नाही काही //
