Home Breaking News Chimur taluka@ news • काॅंग्रेसचे नेते चरणदास कुमरेंचा भाजपात प्रवेश

Chimur taluka@ news • काॅंग्रेसचे नेते चरणदास कुमरेंचा भाजपात प्रवेश

196

Chimur taluka@ news
• काॅंग्रेसचे नेते चरणदास कुमरेंचा भाजपात प्रवेश

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चिमूर :चिमूर तालुक्याच्या नवेगाव पेठ येथील काॅंग्रेसचे नेते चरणदास कुमरे यांनी आ. कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चिमूर येथील त्यांच्या निवासस्थानी भाजप पक्षात प्रवेश केला.आमदार बंटी भांगडीया यांनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून स्वागत केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजू झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणीचे सदस्य वसंत वारजूकर,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशचे उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेशचे सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा ज्येष्ठ नेते भिमराव ठावरी, सं.गां.नि.अ.यो. समितीचे अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा युवा नेते प्रफुल कोलते, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश कंचर्लावार, भाजपा ज्येष्ठ नेते गुलाबराव फरकाडे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष कलीम शेख, भाजपा शहर उपाध्यक्ष फारुख शेख, सरपंच ग्रा.पं. कवडशी (डाक) शुभम ठाकरे, सुरेंद्र झाडे या शिवाय अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.