Home Breaking News Ghugus city @news • नगर परिषद कर्मचाऱ्यांना सर्वोतोपरी न्याय मिळवून देणार- विवेक...

Ghugus city @news • नगर परिषद कर्मचाऱ्यांना सर्वोतोपरी न्याय मिळवून देणार- विवेक बोढे • नगर परिषद कर्मचाऱ्यांनी घेतली विवेक बोढे यांची भेट

89

Ghugus city @news
• नगर परिषद कर्मचाऱ्यांना सर्वोतोपरी न्याय मिळवून देणार- विवेक बोढे
• नगर परिषद कर्मचाऱ्यांनी घेतली विवेक बोढे यांची भेट

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस :नगर परिषद कर्मचाऱ्यांनी रविवार, १८ फेब्रुवारी रोजी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची भेट घेतली व आपल्या समस्या सांगितल्या.

नगर परिषदेच्या समावेशनात काही कर्मचाऱ्यांना घेण्यात आले नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची भेट घेतली व आपल्या समस्या सांगितल्या याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सर्वोतोपरी न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.