rajura taluka@ news
•राजुरा पोलीस स्टेशन येथे एकुण 10 घरफोडी गुन्हे उघडकीस.
•6,03,900/- रू चा माल आरोपी कडुन केले जप्त
✍️ संजय तिवारी
सुवर्ण भारत: प्रतिनिधी, राजुरा
राजुरा: राजुरा तालुक्यातील साखरावाही येथील घटना दिनांक 13/02/2024 चे सकाळी 10.00 वा. सुमारास फिर्यादी व त्याची पत्नी घराला कुलुप लावुन शेतामध्ये गेले व शेतामध्ये दिवसभर काम करून सायंकाळी 05.00 वा. परत आले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दरवाज्याचा ताला तोडुन आत प्रवेश करून सामान अस्ताव्यस्त करून आलमारीचे लॉकरमध्ये ठेवुन असलेले 06 नग सोन्याचे जिवत्या प्रत्येकी अर्धा ग्रॉम वजनाचे एकुण 11,000/- रू चा मुद्देमाल चोरून नेली अशा फिर्यादीचे तक्रारीवरून गुन्हा नोद करून तपासात आहे.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन घटनास्थळी भेट देवुन गुन्हयाचे अज्ञात आरोपीचा शोध करीत असतांना दिनांक 15/02/2024 रोजी मिळालेल्या मुखबिरच्या खबरेवरून रामपुर येथे रहिवासी समरू देवरसिंग निषाद, वय 40 वर्षे,मूळ – बिहारी खुर्द, ता. आंबागड चौकी, जि. राजनांदगाव, पोलीस ठाणे-आंबागड चौकी, राज्य छत्तीसगड एच.एम. कामगार नगर रामपूर, ता. राजुरा, जि. चंद्रपूर आणि बलराम दुर्जन निषाद वय 27 वर्ष, मूळ – बिहारी खुर्द, ता. अंबागड चौकी, जिल्हा-राजनांदगाव, राज्य-छत्तीसगड, एच. मु. महेश नगर, तुकूम ख्रिश्चन दवाखान्याचे मागे रेल्वे पटरीजवळ चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर यांना रामपुर हददीतील शिवमंदीर च्या मागे संशयास्पद दिसुन आल्याने पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी प्रथमता उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यांना बारकाईने विचारपुस केली असता गुन्हा केल्याचे कबुली. एकुण 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी 1) सोन्याचे दागिने अंदाजे वजन 140 ग्रॅम कि.अंदाजे. 5,08,500/- 2) चांदीचे दागिने अंदाजे वजन 170 ग्रॅम वजन कि. अंदाजे.8300/- रू, 3) नगदी 7000/- रू 4) घरफोडी करणे करीता वापरलेले हत्यार कि.अं. 100/-रु. 5) गुन्हा करताना वापरलेली, रु. 80,000/- किमतीची होंडा साइन मोटार सायकल.
6,03,900/- रू चा माल आरोपी कडुन हस्तगत करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम चंद्रपुर, उप विभागिय पोलीस अधिकारी दिपक साखरे राजुरा, यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे नेतृत्वात गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी इंचार्ज पोउपनी पांडुरंग हाके. पोहवा सुनिल गौरकार, पोहवा किशोर तुमराम, पोशी महेश बोलगोडवार, पोशी तिरूपती जाधव, पोशी रामराव बिंगेवाड, पोशी योगेश पिदुरकर, सफौ. खुशाल टेकाम यांनी पार पाडली.




