” मनी असावा आत्मविश्वास ”
चंद्रपूर:किरण घाटे
🔲🔸🔲मी होती साधी भोळी
दुनियादारी नव्हती कळली——–
शब्द ना येती ओठांवरती
वादळे होती मनात किती//
मन म्हणाले किती सोसती
चल उठ बदल स्वतःला——–
बघ किती काळ बदलला
तू का घातले बंधन स्वतःला//
मन हे उडती वाऱ्या संगे
जणू लाट जशी सागरा वरती——–
पक्षी होऊन घे भरारी
बदल स्वतःला ने शिखरावरी//
नारी तू शक्ती शाली
जशी विर झाशीची राणी——-
तुला न म्हणती अबला कोणी
वीरांगना तू माय माऊली//
🟩🔸🟫सौ.वैजयंती विकास गहुकर योगा टीचर चंद्रपूर
vaijugahukar@gmail.com🔸 संकलन -उज्वला निमगडे दुर्गापूर चंद्रपूर ⬜
