Home Breaking News Nagbhid taluka@ news • स्व.ज.स.जनवार जन्मशताब्दी समारोपीय सोहळ्या साठी सरसंघचालक मोहन भागवत...

Nagbhid taluka@ news • स्व.ज.स.जनवार जन्मशताब्दी समारोपीय सोहळ्या साठी सरसंघचालक मोहन भागवत २६ फेब्रुवारीला नागभीड मध्ये

28

Nagbhid taluka@ news
• स्व.ज.स.जनवार जन्मशताब्दी समारोपीय सोहळ्या साठी सरसंघचालक मोहन भागवत २६ फेब्रुवारीला नागभीड मध्ये

अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड:-गोंडवन विकास संस्था नागभीड चा सुवर्ण महोत्सव तथा संस्थापक सचिव स्व.जयसिंह जनवार गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपीय सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोज सोमवारला नागभीड येथे उपस्थित राहणार आहेत.
गोंडवन विकास संस्था नागभीड अंतर्गत संचालित कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे दुपारी २.०० वाजता त्यांचे आगमन होणार असून संस्थापक सचिव स्व.ज.स. जनवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि नवनिर्मित स्व. वसंतराव कसबेकर सभागृहाचे उदघाटन त्यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
त्यानंतर दु.३.०० वाजता गोंडवन विकास संस्थेचा सुवर्ण महोत्सव तथा स्व. ज.स. जनवार यांच्या जन्मशताब्दी समारोपानिमित्त रुख्मिणी लॉन नागभीड येथे आयोजित मुख्य सोहळ्यासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गोंडवन विकास संस्थेचे अध्यक्ष राजा देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांची उपस्थिती लाभणार आहे.

तालुक्यातील जनता व पालकवर्ग यांनी बहुसंख्येने या*स्व.ज.स.जनवार जन्मशताब्दी समारोपीय सोहळ्यासाठी सरसंघचालक प.पू. मोहनजी भागवत २६ फेब्रुवारीला नागभीडमध्ये*

अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड——गोंडवन विकास संस्था नागभीड चा सुवर्ण महोत्सव तथा संस्थापक सचिव स्व.जयसिंहजी जनवार गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपीय सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य मोहनजी भागवत हे दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोज सोमवारला नागभीड येथे उपस्थित राहणार आहेत.
गोंडवन विकास संस्था नागभीड अंतर्गत संचालित कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे दुपारी २.०० वाजता त्यांचे आगमन होणार असून संस्थापक सचिव स्व.ज.स. जनवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि नवनिर्मित स्व. वसंतराव कसबेकर सभागृहाचे उदघाटन त्यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
त्यानंतर दु.३.०० वाजता गोंडवन विकास संस्थेचा सुवर्ण महोत्सव तथा स्व. ज.स. जनवार यांच्या जन्मशताब्दी समारोपानिमित्त रुख्मिणी लॉन नागभीड येथे आयोजित मुख्य सोहळ्यासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गोंडवन विकास संस्थेचे अध्यक्ष श्री. राजाभाऊ देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांची उपस्थिती लाभणार आहे.
तालुक्यातील जनता व पालकवर्ग यांनी बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे गोंडवन विकास संस्था सचिव श्री. रवींद्रजी जनवार व सर्व संचालकवृंद यांनी केले आहे. संचालकवृंद यांनी केले आहे.