Home Breaking News Ghugus city @news •नकोडा येथे श्री संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात ...

Ghugus city @news •नकोडा येथे श्री संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात •चर्मकार समाजाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध- विवेक बोढे

35

Ghugus city @news
•नकोडा येथे श्री संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात

•चर्मकार समाजाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध- विवेक बोढे

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: येथून जवळच असलेल्या नकोडा येथे शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी श्री संत रविदास महाराजांची ६४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जि. प. सभापती ब्रिजभूषण पाझारे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, समाज एकत्र आला तर आपल्या समाजाचा विकास होणार व समाजाला विविध योजनांचा लाभ मिळवून देणार.

अध्यक्षस्थानी असलेले पश्चिम विदर्भ तथा निरीक्षक जिल्हा नांदेड संभाजी वाघमारे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर विवेक बोढे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, चर्मकार समाजाने विधवा योजना, श्रावणबाळ योजना, संजयगांधी निराधार योजना, घरकुल योजना इत्यादी योजनेबद्दल ज्या-ज्या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास पटून दिला समाजाला कुठल्याही अडचणी उद्भवतील त्यासाठी पाहिजे ती मदत करू असा खात्रीपूर्वक विश्वासजनक शब्द व्यक्त केला.

यावेळी सरपंच नकोडा किरण बंदूरक, उपसरपंच नकोडा मंगेश राजगडकर, जिल्हा ग्रामीण चर्मकार समाज अध्यक्ष माधव देशमाने, माजी पं. स.सदस्य चंद्रपूर सविता कोवे, सर्व नकोडा ग्रा. पं. सदस्य, युवाअध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ घुग्घुस शहर, प.पु. श्री संत रविदास महाराज बहुद्देशिय महिला मंडळ नकोडा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, श्री संत रविदास महाराज नवयुवक कमेटी नकोडा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सहसचिव,कोषाध्यक्ष सर्व मान्यवर उपस्थित होते.