• गट प्रवर्तक मानधन वाढीचा प्रस्ताव
मंत्रिमंडळ बैठकीत परत चर्चेला घेवू- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृती समितीला आश्वासन
मुंबई :किरण घाटे
आशा गट प्रवर्तक बाबत शासन निर्णय पत्रात गट प्रवर्तकांना फक्त १ हजार रूपये वाढ केली आहे. राज्यातील आशांना ५ हजार रुपये मोबदला वाढ दिली आहे. राज्यात ७८हजार आशा आहेत तर ३८००गट प्रवर्तक काम फक्त प्रवास भत्त्यावर करतात. उच्च शिक्षित गट प्रवर्तकांना राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी १०हजार मोबदला वाढीचे लेखी पत्र दिले होते. मात्र आता त्यांना फक्त १हजार रुपये वाढ जाहीर झाल्याने गट प्रवर्तकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ना. देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृह येथे नुकतीच ना. नरहरी झिरवाळ यांनी भेट घालून दिली. ह्या प्रसंगी अजित दादा पवार यांनी गट प्रवर्तक निर्णय बाबत पुन्हा मंत्रीमंडळ बैठकीत विषय येणार आहे. व आपल्या मागणीचा विचार केला जाईल. असे आश्वासन दिले. ना. नरहरी झिरवाळ यांनी गट प्रवर्तक निर्णय बदल करुन न्याय देण्याची भूमिका मांडली या वेळी उज्वला पडलकर, कॉ. राजु देसले, कॉ. आनंदी अवघडे,निलेश दाथखीले, दिलीप उटाणे, कॉ. मुगाजी बुरुड, मनोहर पगारे यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे, यांची भेट घेत त्यांना गट प्रवर्तकांच्या मागणीचे एक निवेदन दिले . महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कृती समिती गट प्रवर्तकांना योग्य मोबदला वाढ होईपर्यंत व कंत्राटी कर्मचारी दर्जा मिळेपर्यंत लढा व पाठ पुरावा सुरूच ठेवणार आहे. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा पाठपुरावा गट प्रवर्तक व कृती समिती सुरुच ठेवणार आहेत.
