Home Breaking News •चंद्रपूरात थाटात व उत्साहात पार पडला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम! • महिला...

•चंद्रपूरात थाटात व उत्साहात पार पडला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम! • महिला पतंजली योग समिती व मुक्ती फाऊंडेशन केले होते कार्यक्रमाचे आयोजन!

682

•चंद्रपूरात थाटात व उत्साहात पार पडला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम!
• महिला पतंजली योग समिती व मुक्ती फाऊंडेशन केले होते कार्यक्रमाचे आयोजन!

चंद्रपूर:किरण घाटे

महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व चंद्रपुर व मुक्ती फाऊंडेशन यांनी रविवारला येथील स्थानिक जैन भवनात राज्य प्रभारी महाराष्ट्र पूर्वच्या शोभा भागिया यांच्या नेतृत्वाखाली राज्य कार्यकारिणी सदस्या स्मिता रेभनकर जिल्हा प्रभारी नसरीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जागतिक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सपना सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले . सदरहु जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
डॉ.सौ.प्रेरणा कोलते छबु वैरागडे
मंजुश्री सुभाष कासंनगोट्टूवार,गायत्री कोतपल्लीवार ,सोनिया जडेजा प्रामुख्याने उपस्थित होत्या
कार्यक्रमाची सुरुवात ही
पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्जवलन करुन झाली.या वेळी आयोजक समिती तर्फे उपस्थित पाहुण्यांचा शाल श्रीफळ,मोमेंटो व योग पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित पाहुण्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी काही महिलांना भेटवस्तु देऊन त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तद्वतच जिल्हा व तालुका स्तरीय उपस्थित महिलांना देखील या वेळी भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या राज्य प्रभारी महाराष्ट्र पूर्वच्या अध्यक्ष शोभा भागिया यांनी काही महिलांची पतंजली योग समिती चंद्रपूरच्या (महिला) पदी नियुक्ती करत त्यांना पदभार सोपविला त्यांचा कार्यक्रम स्थळी सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण नसरीन शेख यांनी केले त्यांनी महिला पतंजली समितीने आज पावेतो केलेल्या कामांचा लेखाजोखा आपल्या प्रास्ताविकातून मांडला.याच कार्यक्रमात जिल्हा प्रभारी पदी चंद्रपूर शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्त्या अपर्णा प्रविण चिडे,जिल्हा महामंत्री चंद्रपूर पदी
प्रतिभा विजय रोकडे व तालुका प्रभारी चंद्रपूर पदी आशा योगेश्वर दुधपचारे यांची नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमाला चंद्रपूरसह जिल्ह्याभरातील महिला पतंजली समितीच्या महिला पदाधिकारी व अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन आशा दुधपचारे व रेणूका साटोने यांनी केले.थाटात व उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने सविता मसराम , इंद्रायणी सैनी,जया धारणकर,सुमन वराटे,आशा देवाळकर,झरणा सरकार ,अपर्णा चिडे ,प्रतिभा रोकडे,आशा दुधपचारे
ज्योती मसराम,वंदना भूषणवार, शारदा डाखोरे ,स्मिता श्रीगडीवार मनीषा गौरकार, लता चाफले,रेणुका साटोणे,अंजली साटोने,कामिनी वैरागडे,ज्योती कुंभारे ,सविता मसराम,माधुरी बोडेकर,चितवन चव्हाण, निता नागापूरे, कविता सावरकर,विमल काटकर ,वैशाली रामेडवार या शिवाय चंद्रपुर जिल्ह्यातील कार्यकर्ते, योग शिक्षीका,योग साधिका ,साधक, चंद्रपूर शहरातील जेष्ठ नागरिक व युवा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.शेवटी उपस्थितीतांचे आभार सविता मसराम यांनी मानले .