Home Breaking News •विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

•विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

102

•विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

चंद्रपूर: किरण घाटे

चंद्रपूर अरुणोदय ग्रामीण बहुउद्देशीय संस्थाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.याच वेळी एका कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.डेबू सावली वृद्धाश्रम महाकाली नगरी भाग २ देवाळा येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रपूरच्या सुपरिचित कवियित्रि उज्वला नगराळे यांनी विभूषित केले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंदा कोपूलवार वनमाला रामटेके ,निलिमा पाटील व फुलझेले उपस्थित होत्या. सदरहु कार्यक्रमाचे संचालन सरिता नीळकंठ गव्हारे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार छाया टिकले यांनी मानले.