Home Breaking News •लोकसभा निवडणूक: संभाव्य अपक्ष उमेदवार निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडेंनी मागितला एसपींना सशस्त्र...

•लोकसभा निवडणूक: संभाव्य अपक्ष उमेदवार निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडेंनी मागितला एसपींना सशस्त्र पोलिस बंदोबस्त!

623

Chandrapur@ dist news

•लोकसभा निवडणूक: संभाव्य अपक्ष उमेदवार निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडेंनी मागितला एसपींना सशस्त्र पोलिस बंदोबस्त!

चंद्रपूर:किरण घाटे

चंद्रपूर -वणी -आर्णी मतदार संघाचे संभाव्य अपक्ष उमेदवार वरोरा निवासी निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडे यांनी पोलिस संरक्षण मिळावे यासाठी एक लेखी अर्ज वरोराचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्फतीने चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचेकडे आज सादर केला आहे.वाळूमाफिया , बिल्डर्स,अनेक वरिष्ठ अधिकारी , कंपनी,तदवतचं काही लोकप्रतिनिधींच्या बाबतीत आपण बेकायदेशीर प्रकरणे उघडकिस आणून ब-याच प्रकरणां संदर्भात फौजदारी केसेस दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.इतकेच नाही तर माझ्या संरक्षणसाठी आपण मला पोलिस खात्यामार्फत सशस्त्र पोलिस संरक्षण देण्यात यावे असे देखील त्यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.